Author: Dr. Neha Dongaonkar, Ayurvedic Skin & Beauty Specialist
Clinic: Skin Heal Solutions Pvt. Ltd.
सध्याचे धावपळीचे युग वाढते प्रदुषण, ताण-तणाव, सदोष आहार पध्दती,निकृष्ट दर्जाचे अन्न्, खाण्यापिण्याच्या सवयीचा बिघडलेला समतोल, त्यामुळे होणारा दोषप्रकोप, बध्दकोष्ठता हयामुळे पुर्वी कधीही न ऐकलेला कानावर आएळु लागलाय. आता त्याने वामनसारखा विराट अवतार धारण केलाय.
ऍलर्जी म्हणजे नेकमे काय हा सर्वसामान्यांना पडणारा प्रश्न त्याचे उत्तर असे आहे काही जणांच्या शरीर पकृतीनुसार त्यांच्या अहारातुन पंचज्ञानेद्रियामार्फत ग्रहण केल्या जाणाऱ्या काही पदार्थमुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीचे शरीरावर उत्पन्न होणारी लक्षणे म्हणजे ऍलर्जी होय. नाक, कान, डोळे, जीभ व त्वचा ही पंचज्ञानेद्रिय आणि ग्रहण करणारी स्पर्श, वास, ऐकणे, पाहणे व खाणे ही त्यांची कार्ये हयामधुनच शरीराची तीव्र प्रतिक्रिया शरीराला असात्म्य घटकाविरुध्द निर्माण होते आणि रुग्ण ऍलर्जीला बळी पडतो. हयांतुनच Allergic Asthma, Allergic Rhinitis, urticaria, like allergic skin disease सारखे आजार निर्माण होतात.
हया बाबतीत आयुर्वेदाचा concept असा आहे, जी व्यक्ती वेळी अवेळी खाणे, राञी जागरण, सकाळी उशीरा उठणे. खाण्याचा शरीरावर अतिरिक्त मारा, फास्ट फुड, आंबवलेले पदार्थ, तेलकट, मसाल्याचे पदार्थ् खाणे, शिवाय शारीरिक कामे कमी करणे, प्रवास, बैठी कामे, व्यायाम न करणे हया सर्वाचा अतिरेक करुन वात पित्त कफादि दोषाचे साम्यावस्था नष्ट करुन त्याचा प्रकोप घडवुन आणतो. त्यामुळे आहाररसातुन निर्माण होणारे, रस, रक्त, मांस,मेद, अस्थि , मज्जा, शुक्र हे सप्तधातु हयामुळे निर्माण होत नाही अथवा त्यात विकृती निर्माण होते त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते व हयातुनच ऍलर्जी ला रुग्ण बळी पडतो. हयासाठी बिघडलेले दोष प्राकृतावस्थेत आणण्याचे काम प्रथम करावे लागते.
ऍलर्जीमुळे होणाऱ्या त्वचारोगात असहय खान, दाह, त्वचेवर पुटकुळया किंवा भाजल्यासारखी फोड येणे, (गाजरगवताचा) संपर्क आल्यास असे होउ शकते. काही वेळा अर्थात त्वचेवर मोठया –मोठया पित्त उठल्यासारख्या गाठी, चकंदळे येणे, ओठ, चेहरा, हातापायाची बोटे तर कधी कधी सर्वांगावर सुज येणे, अरुचि, मळमळ,पित्त वाढलेली लक्षणे दिसुन येतात. हळुहळु ही लक्षणे कमी होउन परत वाढतात असे वारंवार घडु लागते. जीर्ण आजार झाल्यावर पचनविकार अस्वस्थता, डोकेदुखी, अशक्तपणा वाढु लागतो. त्वचारोगामध्ये पित्ताचा उष्ण गुण वाढल्यामुळे रक्तातील उष्णता वाढते, तसेच काही असात्म्य घटक रक्तात मिसळल्यामुळे व रक्ताचे भ्रमण (circulation) शरीरात होत असल्यामुळे त्वचारोगात सार्वदैहिक लक्षणे दिसुन येतात.
शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवुन आहार रसातुन रस, रक्त, मांस, मेद, अस्थि , मज्जा व शुर्क हयांचे व्यवस्थित पोषण व्हावे हयासाठी चिकित्सा केली जाते. हयातुन पित्ताने दुषित झालेले वातकफादि दोषही मुळ अवस्थेत येउ लागल्यानंतर लक्षणांची तीव्रता कमी होउ लागते व रुग्णास आराम वाटु लागतो. शिवाय दोषप्रकोपक आहार सेवन न करता लघू, सकस आहार, पालेभाज्या, फळे सकस आहार सेवन करावा. जेवणाच्या वेळा नियमित असाव्या झोपेया वेळा, जागरण टाळून नियमित ठेवाव्या. बध्दकोष्ठता नसावी. जीर्ण त्वचारोगासाठी तज्ञाच्या सल्ल्यानेच औषधोपचार करणे संयुक्तिक ठरते. दिवसभराच्या आहार, निद्रा हयामध्ये नियमितता आणणे आवश्यक आहे. तुपाचे सेवन, मनुके, अंजीर, दुध हयांचे प्रमाण आहारात वाढवावे. उपाशीपोटी तुप 2 चमचे घ्यावे. धने,जिरे ताज्या दहयाचे ताक सैधंव घालून सेवन करावे. आयूर्वेद व पथ्यापथ्य हाच यावर उत्तम उपचार ठरु शकतो.