कोड हा आजार म्टले की कुणालाही दचकल्या सारखेच होते. कोडाबददल प्रवादही खुप आहेत. हा संसर्गजन्य आहे, हा बराच होउ शकत नाही. हयावर उपचार असते तर कोडाचे ईतके लोक दिसलेच नसते. बऱ्याच ठिकाणी उपचार केले गुण आलाच नाही. अशी बरीच तक्रारवजा कुरकुर पेशंट करतात. हयामध्ये कोडाच्या रुग्णाजवळ राहील्यास त्याचा आजार तुम्हाला अजिबात लागत नाही. हा संसर्गजन्य आजार नाही कोडावर जे उपचार केले जातात ते दिर्घकालीन असतात. सहा महिने, एक वर्ष, दोन-तीन वर्ष, ईतका वेळ उपचाराना लागुच शकतो. हयामध्ये सर्व रुग्ण ईतके दिवस उपचार घ्यायला कंटाळुन उपचार मध्येच सोडुन देतात. त्यामुळे हा पुर्ण बरा हेत नाही. आणी साहजिकच हा काही बराच होत नाही. असा समज निर्माण होउ शकतो. त्यामुळे आलेला रुग्ण हा पुर्णत- नकारात्मक दृष्टीकोन घेउनच येतो.
आयुर्वेदातील प्रसिध्द आचार्य चरकानी हया व्याधीला श्रिवञकुष्ठ म्हटले आहे. श्रवेतकुष्ठ हा व्याधी ष्टसाध्ये म्हणजे कष्टाने, दिर्घकालीन उपचाराने साध्ये होणारा आहे. असे म्हटले आहे. आधु निक शास्ञामध्ये हयावर प्रभावी उपचार नाहीत असे मानल्या जाते. त्यासाठ त्यावर तात्पुरते उपचार म्हणुन लेझर उपचार, स्कीन, स्कीन ग्राफटींग, प्लॅस्टीक सर्जरी हया प्रकारचे केल्या जातात, पण प्रभावी औषधी योजना दिसुन येत नाही.
कोड हा व्याधी का होतो हयाची कारणे शेधायची ठरवली तर कोडाचे रुग्ण प्रचंड वाढलेले आहे. हयामध्ये सध्याची तणावपुर्ण जीवनशैली, सदोष आहार हयामुळे विज्ञानासोबत आजारांचीही प्रगती होत आहे. तणाव असतांना सु केलेले उपचार कमी प्रभावी ठरतात. आपण बऱ्याच ठिकाणी हँपी थॅटस्, प्राणायम वेगवेगळया योगा क्लासेस, श्री श्री रविशंकराची सुदर्शन क्रिया, एस, एस वाय, हया सर्वातुन एकच संदेश दिल्या जाते की सकारात्मक दृष्टीकोन हा आपल्या आजाराबदद्लही ठेवा. त्यामुळे आजार लवकर बरा होतो. त्वचारो उपचा सुरु असतानाही तणावाने वाढतोच हयाला सायको सोमॅटिक डिसऑर्डर म्हणतात.
घराण्यामध्ये कुणाला कोड झालेला आहे त्याच्या पुढच्या पिढीला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही अशी तरी पुढच्या पिढीत तो दिसनु येउ शकतो. सदोष आहारपध्दती दही, मासे, खारट पदार्थ, द्रव पदार्थचे अक प्रमाणात सेवन, पिठुळ पदार्थ, तिळ, गुळ हयासारखे पदार्थ शरीरात क्लेद निर्माण करतात त्यापासुन कुठलही त्वचा रोग होउ शकतो. फळे+ दुध, दुध+मासृ उडीद+मासे हयासारखे पदार्थ एकञ खाउ नये शीवाय जंक फुड, मीठ जास्त प्रमाणात, लोणची, पापड ही खाउ नये.
अनुवंशीकता हयामध्ये घरात कुणाला कोड नसेल तरीही नव्याने कोड झालेली रुग्ण दिसुन येतात तर काहीच्या घराण्यात कुणाला तरी कोड झाल्याचा इतिहास आढळुन येतो असे दोन्ही प्राकरचे रुग्ण दिसुन येतात. ही सर्व सामान्य कारणे दिसुन येतात.
थॉयराईडसचे आजार, काही आजारावर जास्त प्रमाणात घेतल्या गेलेली औषधे, सतत आंबट पदार्थाचे सेवन हयामुळेही कोड हा व्याधी होउ शकतो. अष्टांग हदय हया गंथांमध्ये श्रवेञकुष्ठाची उत्पती वात, पित्त, कफ आणी क्त, मांस, मेद हया तीन धातु व ञिदोषामुळे उत्पन्न् होतो व हया धातुमध्ये त्याचा आश्रय राहतो असे वर्णन केलेले आहे. वाता श्विञ रुक्ष व अरुण वर्णीय, पित्तज श्विञ तांब्यासारखे व लात कमळासारखे व दाहयुक्त, तथा कफज श्विञ सफेद मेदधातुत अलजत असतात. हयाप्रकारानुसार त्याच्यावरील उपचाराच्या कालावधीला कमी जास्त वेळ लागु शकतो.
उपचार- आयुर्वेदात विविध औषधी कल्पाचा वापर करुन कोडावर उपचार केल्या जातो. प्रथम निराश झालेल्या रुग्णाला कॉन्सलिंग करुन त्यांच्यातील नकारात्मकता (निगेटिव्हीटी) काढावी लागते. त्यांना धीर दयावा लागतो. त्यानंतर औषधोपचार सुरु होउन त्यांना उत्तम प्रतिसाद मिळु लागल्यावर रुग्णाचा आत्मविश्वास वाढु लागतो. हयासाठी औषधी सेवनासोबत पथ्य पाळणे आवश्यक आहे. आतपसेवन (उन घेणे) आंबट, खारट व क्लेदकारक पदार्थ वर्ज्य करुन आयुर्वेदोपचाराने रुग्ण पुर्णत: बरा होउ शकतो.