सोरायसिस हया आजाराबददल पेपरमध्ये बरेच लेख प्रसिध्द झाल्यामुळे तसा हा आजार सर्वांना माहित आहे. हयाबददल भयंकर आजार, चिवट आजार, ञासदायक, बरा न होणारा असे आपण एकतो. त्यामुळे सोरायसिस झालेल्या रुग्णांना हा महाभयंकर आजार आपल्याला झालेला आहे. त्यातुन आपण कधीच बरे होणार नाही ही भावना प्रबळ होउन रुग्ण खुपच ञस्त व नकारात्मक झालेला असतो. हयाबददल आयुर्वेदात काय उपचार आहेत सांगतायत प्रसिध्द त्वचारोगतज्ञ डॉ. सौ. नेहा डोणगावकर
सोरायसिस खुप चिवट आजार आहे का?
उत्तर- हा आजार बरा व्हायला एक ते दोन वर्षाचा कालावधी लागतो त्यामुळे त्याला चिवट आजार म्हणतात. आयुर्वेदातील किटिभ कुष्ठाशी हयाची तुलना केल्या गेली आहे. सोरायसिस हा आजार कष्टाने साध्य होणारा म्हणुन कष्टसाध्य समजल्या जातो. हयामध्ये आधुनिक शास्ञानुसार सोरायसिस हा ऍटो ईम्यून डिसीज आहे त्यामुळे तो कधीच बरा होउ शकत नाही असा मतप्रवाह दिसुन येतो. शीवाय त्याला आटोक्यात आणण्यासाठी स्टीरॉईडस् किंवा काही रुग्णामध्ये अँटी- कॅन्सरस् ड्रग्स जसे की मिथो – ट्रिक्झेट हयासारखे मेडीसिन वापरल्या जाते. त्याचे दुष्परिणाम असे की, ऍनिमिया, लिव्हर सारख्या व्हायटल ऑर्गनवर परिणाम होउ शकतो. त्यामुळे प्रत्येकच रुग्णाबाबत असे उपचार शक्य होत नाही. हयाउलट आयुर्वेदातील औषधाने दुष्परिणाम होत नाही. आजार हि पुर्णपणे बरा होउ शकतो.
सोरायसिस म्हणजे नेमकी काय लक्षणे व प्रकार असतात?
उत्तर – सोरायसिस हया आजारामध्ये त्वचेमध्ये भयंकर कोरडेपणा येउन जमिनिला जश्या भेगा पडतात. त्याप्रमाणे त्वचेची अवस्था होते. आपल्या सर्व शरीरावर त्वचेचे आवरण पसरलेले असते. 20-30 दिवसामध्ये पहिली त्वचा मृत त्चचा तयार होत असेल पण सोरायसिस मध्ये चार पाच दिवसामध्ये वरचे वर मृत त्वचा निघु लागते. त्याचा जाड थर तयार होतो. त्याला खुप खाज येउन खाजल्यावर कोंडा निघु लागतो. जास्त खाजल्यावर रक्त येउन जखमा होतात. सोरायसिसची सुरुवात होतांना गोल, लालसर चटटे, फुगीर स्वरुपाचे त्वचेवर दिसु लागतात. हयाचे प्रकार वेगवेगळे असतात. संपुर्ण अंगावर येणारा 1.प्लक सोरायसिस 2. गुटटे सोरायसिस 3. पस्चुलर सोरायसिस 4. ईरॅथ्रोडर्मिक सोरायसिस 5. नेल सोरायसिस 6. सोरायटिक अर्थरायटिस् 7.पाम् सोरायसिस्
हयामध्ये प्रकारानुसार शरीराच्या वेगवेगळया भागावर हा दिसुन येतो. त्यातील काही प्रकार गंभीर स्वरुपाचे असतात. काही साधारण स्वरुपाचे असतात त्यानुसार त्यावर उपचार केल्या जातात. आयुर्वेदात हयाला “ किटिभ कुष्ठ” त्यानुसार , दोषा प्रमाणे त्याचे प्रकार वर्णीलेले आहे.
आयुर्वेदातील उपचाराने सोरायसिस पुर्ण बरा होतो का?
उत्तर – दिर्घकालीन आयुर्वेदिक उपचाराने हा एक अत्यंत चिवट त्वचारोग आहे त्यामुळे खुप दिवस उपचार घेतल्यावर तो पुर्ण बरा होतो. माझ्याकडे एक नउ वर्षाची मुलगी 4-5 महिन्यात पुर्ण बरी झाली. तिच्या डोक्यापासुन पायापर्यंत संपुर्ण शरीरावर पसरलेले लालसर चटटे, त्याच्यावर भरपुर खाज येत होती, खुप वाईट दिसत होते. पण ती हया कालावधीत पुर्ण बरी झाली. त्यासाठी उपचारात नियमितता व पथ्य पाळणे खुपच आवश्यक आहे. तरच रुग्ण पुर्ण बरा होउ शकतो.
हयासाठी कोणती पथ्थे पाळावी लागतात?
उत्तर – आयुर्वेदातील सोरायसिससाठी पथ्थे त्वचेवर क्लेद निर्माण होउ नये त्यानुसार पाळावी लागतात. हयामध्ये अति मीठ खाणे टाळावे. विरुध्दान्न घेउ नये, दुध+केळी, दुध+ कुठलेही फळ, दुध+मासे, उडीद डाळ+दुध, दुध+ मीठ, शीळे अन्न, तिखट, आंबट, खारट,गोड सर्व रसाची एकञ स्वाद (पाणीपुरी, भेळ) असलेले पदार्थ टाळावे. जंक फुड, अति जड, तेलकट, आंबट, आंबवलेले पदार्थ टाळावे. पथ्थ्यामुळे आयुर्वेदातील औषधोपचाराचे परिणाम खुप चांगले दिसुन येतात.
डॉक्टर, हिवाळयात सोरायसिस हा आजार वाढतो का ?रुग्णाची मानसिकता हया त्वचारोगाचा काही संबंध आहे का?
उत्तर – हो, हिवाळयात ज्या रुग्णांना सोरायसिस आहे, त्यांचा जास्त वाढायला लागतो व काही रुग्णांना हिवाळयात हा त्वचारोग होतो, सुरुवात होते. हयाचे प्रमुख कारण त्वचा कोरडी होणे हे आहे व हिवाळयात हवा कोरडी व थंडीमुळे कोरडे पण वाढतो. त्यामुळे हिवाळयात हयाचे रुग्ण खुप बघायला मिळतात. काही प्रकारामध्ये तिन्ही ऋतुत तेवढीच फ्रिक्वेन्सी दिसुन येते.
रुग्णाची मानसिकता हयावर आपल्याकडे उपचार करतांना उदासिनता दिसुन येते. खर तर कुठल्याही त्वचारोगात रुग्णाचे “मानसिक आरोग्य” अत्यंत महत्वाचे मानल्या जाते. कारण जवळपास सर्वच जुनाट आजार सायको-सोमॅटिक असतात. काही प्रसंग काही अनुभव, काही ञासदायक घटना हयामुळे मनात दडुन बसलेली भीती, पश्चाताप, रोग, नकारात्मकता हयाचा परिणाम शारीरीक आरोग्यावर होउन त्वचारोगादवारे बाहेर निघतात. रुग्णाचा इतिहास घेताना हयाचा संदर्भ लागु शकतो. हयासाठी रुग्ण व डॉक्टरामध्ये योग्य समन्वय साधल्या गेला पाहिजे. रुग्णाला तेवढा वेळ दयावा लागतो. मग सोरायसिस, कोड कुठलाही त्वचारोग बरा होण्यास काहीच अवघड नाही.