Marathi May 25, 2026

कोड का वाढतोय

N

Dr. Neha Dongaonkar

Ayurvedic Physician · Skinheal Solutions

कोड का वाढतोय

खालील प्रणाने काही बऱ्या झालेल्या रुग्णांचे वर्णन ( जागेअभावी फोटो देता येत नाही )

१. केस नं.१ – ही केस वैद्यकशास्त्रातील चमत्कारच आहे. ५७ वर्षे वय असलेली ता.नेवासा जि.अहमदनगर येथील स्त्रीरुग्ण जीला गेल्या ४० वर्षांपासून कोड होता. चेहरा सोडला तर पाठीवर, संपूर्ण हात, गुडघ्यापासून खाली पाय, पोटावरील डाग तर तिने लज्जेमुळे दाखवलेच नाहीत. अनेक उपचार केले. त्यांच्या आत्याला कींवा वडिलांना कोणाला तरी हा आजार होता. यातील क्रिटिकल पॉईंट्स – फॅमिली हिस्ट्री, वय ५७ च्या पुढे मासिक पाळी गेलेली, कोड ४० वर्षे जुना शिवाय वयानुसार शरीराची पचन शक्ती, यकृताचे कार्य कमी झालेले, सांध्यांना होणार त्रास. रुग्ण बघितल्यावर मी सुद्धा त्यांना प्रयत्न करूया असे सांगितले. उपचार पथ्यपाणी सुरु झाले घरी डेअरी असतांना दूध-दही बंद करणे रुग्णासाठी फार त्रासदायक होते. तरीही रुग्णाने उत्तम सहकार्य केले. नियमित औषधे, पथ्य व ऊन दाखविणे या तिन्ही गोष्टींचे व्यवस्थित पालन केले त्यामुळे २ वर्षात संपूर्ण शरीरावरील डाग गेले. फक्त हाताची बोटे, पायाची बोटे आणि गुडघ्या खालचा काही भाग फक्त राहिला. संपूर्ण नातेवाईक आणि गावातील लोकांना आश्चर्य वाटले. खरोखर आयुर्वेदात खूपच उत्साहित करणारी औषधे कोड व सोरायसिसवर आहे. उत्तरोत्तर संशोधन सुरूच आहे. फक्त विश्वास ठेवून संयमाने उपचार कारणे गरजेचे आहे.

२. केस नं.२- लग्नाची मुलगी तालुक्यातून आलेली. ओठांवर पांढरे डाग, वडील चिंताक्रांत, बघण्यासाठी पाहुणे आलेच तर कसे होणार ? डाग, ओठांवर असल्याने थोडा वेळ जास्त लागणार. १ वर्ष तरी लग्न करू नका दाखवायचा कार्यक्रमही नको. अशा स्थितीत पण नियमित उपचार सुरु झाले ७-८ महिन्यातच फरक पडला. नंतर प्रिकॉशन म्हणून ३ महिने उपचार सुरूच ठेवला. आता “ती” सासरी सुखी आहे. आयुर्वेदशास्त्राकडे लोक फार उशिरा वळतात. त्यामुळे उशीर होतो व रोग बळावतो. त्वचारोग, पोटाचे विकार, यकृताचे आजार, डोकेदुखी या उपचारांसाठी आयुर्वेद खूपच उत्तम.

३) दैवी कोप – ग्रामीण भागातून रुग्णांचा यावर प्रचंड विश्वास असतो. देवाचा काहीतरी नवस पूर्ण केला नाही म्हणून देवाचा कोप झाला. तसेच गावठी उपचारात वेळ घालवून नंतर रुग्ण दवाखान्यात धाव घेतात आणि आजार पटकन निघून जावा असे त्यांना वाटते. यात शरीरातील अंतर्गत घडामोडींमुळे त्वचेच्या रंगपेशींमध्ये दोष निर्माण होऊन त्वचेचा रंग नाहीसा करतो. त्यात बिचाऱ्या देवाचा काहीही दोष नाही. तेव्हा, उगीच रोग वाढवून घेण्यापेक्षा त्वरित उपचार करावेत.

पण शास्त्रीय आयुर्वेदिक औषधांचा उत्तम उपचार, पथ्य व नियमित चिकित्सा यामुळे हा रोग हळूहळू बरा होऊ शकतो.

आयुर्वेदाकडे वळूया…

आयुष्य मुक्तपणे जगूया…

डॉ. नेहा डोणगावकर
फोन नं. ०२४० – २४८०९२६
मो. नं. ८६००९९७८१७

Filed under Marathi Skinheal Journal
← All Articles
Personalised Care

Looking for Safe & Effective Vitiligo Treatment?

At Skinheal Solutions, we treat the root cause by balancing Pitta dosha, restoring digestion, and supporting natural melanin production.

Comments

Be the first to share your thoughts 🌿

Your comment will appear after moderation.

Leave a Comment

Comments appear after moderation.

Do you know Panchakarma?